MCC Pro 40 League Cricket Tournament
  • February 9, 2026
  • quirkycraftech@gmail.com
  • 0


Akshat Amol Dhas 27 runs (19) and 2/24 was declared the Player of the Match.

MCC Red record emphatic 113-run victory

Mumbai: MCC Red proved too strong against organisers Jwala Sports Foundation romping to a 113 run win in their MCC Pro 40 League Cricket Tournament (Elite Group) and played at the Oval Maidan.

Put into bat, MCC Red scored 223 for seven in their 40 overs with Shreyas Phapale contributing 82 runs from 110
balls. Rajnish Kumar claimed 2 for 30 for JSF.

An unbeaten 41 from 50 balls by Devashish Gokhale was in vain as Bhaagya Limbanii came up with an inspired spell bagging four wickets for five runs to skittle out JSF for 110 all out in 30.4 overs.

Akshat Amol Dhas 27(19) and 2/24 was the Player of the Match.

MARATHI REPORT

एमसीसी रेडचा ११३ धावांनी विजय

  • एमसीसी प्रो-४० लीग क्रिकेट स्पर्धा

मुंबई: ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित एमसीसी प्रो-४० लीग क्रिकेट स्पर्धेत (एलिट ग्रुप) एमसीसी रेड संघाने यजमान ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन (जेएसएफ) संघावर ११३ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

जेएसएफ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एमसीसी रेडने ४० षटकांत ७ बाद २२३ अशी मोठी धावसंख्या उभारली. श्रेयस फापळेने ११० चेंडूत ८२ धावा करत त्यात सर्वाधिक योगदान दिले. अक्षत अमोल धसने १९ चेंडूत २७ धावा केल्या. जेएसएफकडून रजनीश कुमारने ३० धावांत २ विकेट घेतल्या.

मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना जेएसएफचा डाव ३०.४ षटकांत ११० धावांत आटोपला. त्यांच्याकडून देवाशिष गोखलेने (५० चेंडूत नाबाद ४१ धावा) थोडा प्रतिकार केला. भाग्य लिंबानीने अवघ्या ५ धावांत ४ विकेट घेत विजय सुकर केला. अक्षत धसने २ विकेट घेत त्याला चांगली साथ दिली.

अष्टपैलू अक्षत धस याला (१९ चेंडूंत २७ धावा आणि २४ धावांत २ विकेट) सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक: एमसीसी रेड – ४० षटकांत ७ बाद २२३(श्रेयस फापळे ८२(११०), अक्षत धस २७, रजनीश कुमार २/३०) विरुद्ध ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन ११० ३०.४ षटकांत सर्वबाद (देवाशिष घोडके ४१*(५०), भाग्य लिंबानी ४/५, अक्षत धस २/२४). निकाल: एमसीसी रेड ११३ धावांनी विजयी. सामनावीर: अक्षत धस २७(१९) आणि २/२४.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *