Mumbai: MCC Thane Arecorded a comfortable five-wicket victory over Vibgyor Strikers in the MCC Talent Search Under-12 League Tournament 2025–26, organised by the Jwala Sports Foundation and played at the Oval Maidan.
Vibgyor making first use of the wicket, scored 194 all out in 35 overs, powered mainly by Hriday Mehta who scored 45 from 52 balls.
Ayush Sutar with three for 25 and Rachit Patil with three for 31 did the star turn for the Thaqne outfit.
In their spirited reply,Vivaan Gurjat was in splendid form, scoring 103 from 87 balls to help the MCC team overhaul the target scoring 195 for 5 in 32.5 overs.
Rachit Ashish Patil with 3/31 and 36 from 38 ball was adjudged Player of the Match.
Marathi report
एमसीसी ठाणेच्या विजयात शतकवीर विवान, अष्टपैलू रचित चमकले
- एमसीसी लिटिल स्टार (१४ वर्षांखालील) क्रिकेट लीग
मुंबई: ज्वाला स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित एमसीसी लिटिल स्टार लीग (१४ वर्षांखालील) स्पर्धेत एमसीसी ठाणे अ संघाच्या विजयात शतकवीर विवान गुर्जर आणि अष्टपैलू रचित पाटील चमकले.
पहिल्या सामन्यात, एमसीसी ठाणे अ संघाने विबग्योर स्ट्रायकर्सवर ५ विकेट राखून मात केली. विबग्योर स्ट्रायकर्सनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ३५ षटकांत १९४ धावा केल्या. त्यात हृदय मेहताने (५२ चेंडूत ४५ धावा) सर्वाधिक योगदान दिले. एमसीसी ठाणे संघाकडून आयुष सुतार (३/२५), रचित पाटीलने (३/३१) प्रभावी मारा केला.
एमसीसी ठाणे अ संघाने प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान ३२.५ षटकांत ५ विकेटच्या बदल्यात पार केले. विवान गुर्जरने ८७ चेंडूत १०३ धावांची झटपट खेळी करून विजयात मोलाचा वाटा उचलला. रचित पाटीलने ३८ चेंडूत ३६ धावा फटकावत त्याला चांगली साथ दिली. अष्टपैलू रचित याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
अन्य सामन्यांत, एमसीसी सांताक्रूझ व भांडुप संघांनी विजय मिळवले.
संक्षिप्त धावफलक: पहिला डाव: विबग्योर स्ट्रायकर्स – ३५ षटकांत सर्वबाद १९४(हृदय मेहता ४५(५२), आयुष सुतार ३/२५, रचित पाटील ३/३१) वि. एमसीसी ठाणे अ – ३२.५ षटकांत ५ बाद १९५(विवान गुर्जर १०३(८७), दिव्यम मुथा ३/१८). निकाल: एमसीसी ठाणे अ ५ विकेट राखून विजयी. सामनावीर: रचित पाटील ३/३१ आणि ३६(३८).
एमसीसी ठाणे ब – २५.५ षटकांत ९ बाद ८४(मोहम्मद अमीन ३८(५९), आयुष गुप्ता ३/८) वि. एमसीसी सांताक्रूझ ८ षटकांत २ बाद ८५(अगस्त्य २९(१२), पीयुष तिवारी २/३८). निकाल: एमसीसी सांताक्रूझ ८ विकेट राखून विजयी. सामनावीर: आयुष गुप्ता (३/८).
विबग्योर स्ट्रायकर्स ३०.१ षटकांत सर्वबाद ११५(आशीर बेग २९(४९) वि. एमसीसी भांडुप – १२.२ षटकांत २ बाद ११६(आर्यन चेंबुरकर ८२(४०). निकाल: एमसीसी भांडुप ८ विकेट राखून विजयी. सामनावीर: आर्यन चेंबूरकर ८२(४०).

























